esakal | Vidhan Sabha 2019 : करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा...
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा...

Vidhan Sabha 2019 : करमाळयात अपक्ष संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 
मुंबई - करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय कृष्णराव पाटील (घाटणेकर) यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षाच्यावतीने देण्यात आले मात्र तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता आला नाही.तो अर्ज तसाच आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या सफरचंद चिन्हाचे काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना करण्यात आले आहे.

loading image
go to top