esakal | उपमुख्यमंत्रिपदावर अजित दादाच, दुसरं कोण? NCPच्या मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्रिपदावर अजित दादाच, दुसरं कोण? NCPच्या मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्रिपदावर अजित दादाच, दुसरं कोण? NCPच्या मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, मुंबई

मुंबई : अनेक दिवसांपासून रखडलेला महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. अशातच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद येणार का ? याविषयी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अशातच आता अजित पवारच महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री होणार आहेत. यावर राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने भाष्य केलाय. 

महाराष्ट्र विकास आघाडीचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्रात उत्तम पद्धतीने काम करून दाखवण्याची आमची भूमिका आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान कुणाला कोणतं मंत्रिपद मिळेल याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही, असं देखील दिलीप वळसे पाटील म्हणालेत.

मात्र उपमुख्यमंत्रिपदाबाबत विचारणा केली असता, उपमुख्यमंत्रिपदावर  अजित दादाच, दुसरं कोण? म्हणत अजित पवारच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणार आहेत  स्पष्ट झालंय. 

हे मंत्री घेणार आज मंत्रीपदाची शपथ: 

कॅबिनेट मंत्री :

 1. अशोक चव्हाण
 2. दिलीप वळसे पाटील
 3. धनंजय मुंडे
 4. विजय वडेट्टीवार
 5. अनिल देशमुख
 6. हसन मुश्रीफ
 7. वर्षा गायकवाड
 8. राजेंद्र शिंगणे
 9. नवाब मलिक
 10. राजेश टोपे
 11. सुनील केदार
 12. संजय राठोड
 13. गुलाबराव पाटील
 14. अमित देशमुख
 15. दादा भुसे
 16. जितेंद्र आव्हाड
 17. संदिपान भुमरे
 18. बाळासाहेब पाटील
 19. यशोमती ठाकूर
 20. अनिल परब
 21. उदय सामंत
 22. के. सी. पाडवी
 23. शंकरराव गडाख
 24. अस्लम शेख
 25. आदित्य ठाकरे

राज्यमंत्री

 1. अब्दुल सत्तार
 2. सतेज पाटील
 3. शंभुराजे देसाई
 4. बच्चू कडू
 5. विश्वजीत कदम
 6. दत्तात्रय भरणे
 7. आदिती तटकरे
 8. संजय बनसोडे
 9. प्राजक्त तनपुरे
 10. राजेंद्र पाटील येड्रावकर

Webtitle : NCP senior leader says ajit pawar will become deputy cm of maharashtra 

loading image