'मुख्यमंत्री सहज बोलले की 'घड्याळा'ची वेळ चुकली?'; भाजपचा टोला

मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे?, असा सवाल भाजपने उपस्थित केला
Sharad-Pawar-Uddhav-Thackeray
Sharad-Pawar-Uddhav-Thackeray

CM Uddhav Thackeray Sangli Visit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सोमवारी सांगलीच्या (Sangli Flood) दौऱ्यावर अतिवृष्टी आणि महापूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले. 22 आणि 23 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कृष्णा (Krishna) आणि वारणा (Warna) या नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली होती. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे अजूनही सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना धीर देण्यासाठी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सांगली दौऱ्यावर गेले. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पूर आला की लगेच पॅकेज (Relief Package) जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही'. या मुद्द्यावरून भाजपचे केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. (Sangli Latest News In Marathi)

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडी येथे पोचल्यानंतर बाजारपेठ परिसरात पूरग्रस्तांशी संवाद साधला. "अतिवृष्टीचा अंदाज मिळाल्यापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे स्थलांतर केले. लोकांचे आर्थिक व शेतीचे नुकसान झाले आहे. जीवितहानी होऊ न देण्याला आमचे प्राधान्य आहे. या परिस्थितीवर तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील. आपली त्याला तयारी हवी. कारण दरवर्षी पुराचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की परत पुढच्या वर्षी तेच करणार? दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे", असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

केशव उपाध्येंचा टोला

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला. "(पॅकेजचा पैसा जातो कुठे असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणे हे) म्हणजे असं झालं की लोकांना मदत केली, पॅकेज घोषित केले की त्यातील पैशातून सरकारमधीलच वसुली होते याची प्रामाणिक कबुली दिली आहे का उद्धव ठाकरे? पूरग्रस्तांचा पॅकेज मध्येही वाझे? मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका नेमका कुणाकडे आहे? सहज बोलले की 'घड्याळा'ची वेळ चुकलीय?", असा टोला त्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com