esakal | एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा भाजप वापर करतेय - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

 शरद पवार

एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा भाजप वापर करतेय - शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी सीमाप्रश्नावरही आपलं मत व्यक्त केलं.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सतत आरोप केलं जात आहे. त्यांच्या घरावर पाच छापे मारुन काय साद्य केलं. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस आधिकारी आता आहेत कुठं? असा सवालही यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी लखीमपूर येथील घडलेल्या गोष्टीवरही प्रकाश टाकला. शांततेत रस्त्यावरुन जाणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं गेलं. लखीमपूरमध्ये जे घडलं ते आतापर्यंत कधीचं घडलं नव्हतं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यावर मौन बाळगलं, साधे दु:खही व्यक्त केलं नाही. याप्रकरणी सत्ताधारी पक्षाने भूमिका घेणं गरजेचं होतं, अशी खंतही शरद पवार यांनी बोलूण दाखवली.

जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांवर हल्ला झाला. यामध्ये एका पाच जवानांना वीरमरण आलं. चीनसोबत 13 वेळा बैठका घेण्यात आल्या. पण एकही बैठक यशस्वी झाली नाही. सीमेवरील सद्यास्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे सीमाप्रश्नी राजकारण न करता सर्वपक्षीयांनी भूमिका घेणं गरजेचं आहे, असे शरद पवार म्हणाले.

मावळ गोळीबाराला जालियनवाला बाग म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाही शरद पवार यांनी प्रत्त्युतर दिलं. मावळ गोळीबाराला राजकीय पक्ष नव्हे तर पोलिसच जबाबदार आहेत. येथे स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथवलं होतं, असे शरद पवार म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?

केंद्रीय यंत्रणेपेक्षा मुंबई पोलिसांनी आधिक ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीपेक्षा मुंबई पोलिस आधिक कार्यक्षम आहेत. कुणी शंका घेऊ नये, अशी मुंबई पोलिसांची कारवाई असते.

एनसीबीनं पंच म्हणून निवडलेले गोसावी अनेक वर्षांपासून फरार

केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईचा सत्तेसाठी गैरवापर केला जातोय.

चार वेळा मुख्यमंत्री होते, हे माझ्याही लक्षात नाही, ही माझी कमतरता - मी आजही मुख्यमंत्री आहे या फडणवीसांच्या वक्त्याचा पवारांनी घेतला समाचार

मी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो - पवार

सत्तेत नसल्याचा आजही त्यांना विश्वास नाही, शरद पवारांचा भाजपला टोला

अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमबीर सिंग या पोलिस आधिकाऱ्याचा पत्ता नाही.

लखीमपूर हिंसाचाराबद्दल बंद पाळल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं अंत:करणापासून आभार

यंदा आणि पुढच्यावर्षी महाराष्ट्रात ऊसाचं उत्पादन दुप्पट होईल

महाराष्ट्रात जवळपास 175 साखर कारखाने सुरु होतील

यंदा आणि पुढच्या वर्षी राज्यात रेकॉर्डब्रेक साखर उत्पादन होण्याच्या शक्यता आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात साखर निर्मिती झाली तर किंमत कोसळेल.

साखर उत्पादन वाढल्यास अर्थकारण गडबडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी अर्थशास्तर समजून घेणं गरजेचं आहे.

बंद पडलेले साखर कारखाने सुरु करण्यात यावेत.

साखर कारखाने अडचणीत येऊ शकतात. मुंबईतील गिरण्यासारखी साखर कारखान्यांची अवस्था होऊ नये.

loading image
go to top