Sharad Pawar Death Threat : "मी भाजप कार्यकर्ता, सेक्युलॅरीजमचा हेट करतो!"; पवारांना धमकी देणारा पिंपळकर कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp Sharad Pawar death treat by Saurabh Pimpalkar  Twitter bio mentions BJP activist

Sharad Pawar Death Threat : "मी भाजप कार्यकर्ता, सेक्युलॅरीजमचा हेट करतो!"; पवारांना धमकी देणारा पिंपळकर कोण?

Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आहे. याप्रकारानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेट घेतली. तुझा दाभोळकर केला जाईल अशा स्वरूपाची धमकी ट्विटरच्या माध्यामातून शरद पवारांना देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

धमकी देणार भाजपचा कार्यकर्ता?

शरद पवारांनी ज्या ट्विटर आकाउंटवरून धमकी देण्यात आली, त्याच्या बायोमधे मी भाजप कार्यकर्ता आहे असा उल्लेख आहे. या ट्विटर युजरचे नाव सौरभ पिंपळकर असे असून त्याने त्याच्या बायोमध्ये "मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार आहे" असं लिहीलेलं आहे. दरम्यान यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

ncp Sharad Pawar death treat by Saurabh Pimpalkar  Twitter bio mentions BJP activist

ncp Sharad Pawar death treat by Saurabh Pimpalkar Twitter bio mentions BJP activist

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काही दिवसांपासून पवार साहेबांवर जे लोकं बोलत आहेत. त्यांची चौकशी केली पाहिजे. राणे, पडळकर बोलले आहेत, हे लोकं ज्या पध्दतीने बेताल वक्तव्य करत आहेत, याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का याचा पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी शोध घेतला पाहिजे, असे मिटकरी म्हणाले.

शरद पवर यांच्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर, नारायण राणे आणि त्यांची दोन लेकरं बोलत आहेत, यांची चोकशी झाली पाहिजे. याचे मास्टरमाइंड हेच असू शकतात. यांच्यांच माध्यमातून ही धमकी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सखोल चौकशी गृहमंत्र्यांनी करावी अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरक्षा कवच आहे. धमक्यांना घाबरणारा हा पक्ष नाही. पण तरीही कायदा सुवस्थेचा प्रश्न आंदोलने, पेटलेलं औरंगजेबाचं प्रकरणा यामध्ये कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारने घ्यावी. देवेंद्र फडणवीसांनी हे कोणाच्या सांगण्यावरून झालं याचं उत्तर द्यावं असेही मिटकरी म्हणाले आहेत.

धमकीचं ट्वीट ज्या अकाउंटवरून करण्यात आलं त्यावर मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात आले आहे, या मुद्द्यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, याचा अर्थ स्पष्ट आहे. वडीलांच्या वयाच्या पवार साहेबांवर हे सगळे बोलत आहेत. यांच्या डिटेल्स काढल्या तर हेच आरोपी सापडतील. भारतीय जनता पार्टीकडूनच हे करण्यात आलं आहे. गल्लीबोळातील गुंडांना घाबरणारा आमचा पक्ष नाही असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.