
रामराजे की खडसे? विधान परिषदेसाठी दोघेही शरद पवारांच्या भेटीला
विधान परिषद निवडणुकीची सध्या राज्यभरात धामधूम सुरू आहे. विविध पक्षाचे नेते त्यामुळे आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीच्या इच्छेने धाव घेत आहेत. त्यातून आता कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाची विधान परिषदेवर वर्णी लागणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. (Ramraje Naik Nimbalkar and Eknath Khadse meets sharad pawar)
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून या दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे नाव राज्यपाल नियुक्त बारा जागांसाठी पाठवले आहे. पण अजूनही राज्यपालांनी त्यांना मान्यता दिली नसल्याने आता विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: ठाकरेंच्या निर्णयाने मंत्रिपदावर गदा? विधान परिषदेसाठी सेनेचं धक्कातंत्र
दरम्यान, याच संदर्भात आज सकाळी रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंना गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा आहे. विधान परिषदेसाठी जर राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळाली, तर ती त्यांच्यासाठी मोठी संधी ठरणार आहे.
Web Title: Ncp Sharad Pawar Eknath Khadse Ramraje Naik Nimbalkar Mlc Elections
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..