
Sharad Pawar : 'महाराष्ट्राची सुटका झाली'; शरद पवारांची कोश्यारींच्या राजीनाम्यावर बोचरी टीका
वादग्रस्त विधानामुळे नेहमी वादात सापडत राहीलेले भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी मंजूर केला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून या निर्णयाचं स्वागत केलं जातं आहे. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार काय म्हणाले...
माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. अतिशय चांगला निर्णय जो आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल झाली नव्हाती ती आपण पाहीली.केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी हा बदल केला ही समाधानकारक बाब आहे.
आज रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान नव्या राज्यपालांकडून काय अपेक्षा आहेत असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला यावर बोलताना पवार म्हणाले की, जेजे संविधानाच्या विरोधात झालं असेल त्या सगळ्याची चौकशी झाली पाहीजे असेही शरद पवार म्हणाले. ते टीव्ही ९ शी बोलत होते.