राष्ट्रवादीची आज तातडीची बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता. १७) ‘सिल्व्हर ओक’ या मुंबईतील निवासस्थानी सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होईल.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता. १७) ‘सिल्व्हर ओक’ या मुंबईतील निवासस्थानी सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरेगाव-भीमाचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध केला नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर नमूद केले आहे. आता लवकरच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीसाठी (एनपीआर) माहिती गोळा करण्याचे काम सुरू होणार आहे. या पद्धतीच्या गणनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचे बोलले जाते. उद्याच्या बैठकीत त्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, ‘सरकारच्या पातळीवर कोणतेही वाद नाहीत. पवारसाहेबांनी मंत्र्यांना चर्चा करण्यासाठी बोलावले आहे,’ असे स्पष्ट केले.

काँग्रेसनेही ‘एनपीआर’साठी माहिती गोळा करणे सुरू झाल्यावर कोणती भूमिका घ्यायची, हे ठरविले आहे. लोकसंख्येची नोंद करण्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. एक मेपासून गणना सुरू होणार असून, त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP urgent meeting today