राष्ट्रवादी युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक सेलच्या नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सचिव आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक सेलच्या नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सचिव आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने पक्षासाठी आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणे तळागाळापर्यंत पक्ष बळकटीसाठी नवनियुक्त प्रदेश पदाधिकारी अथकपणे प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Youth Congress declares new body gave Opportunities for new faces