Maharashtra Politics: राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! माजी आमदाराने बांधलं शिवबंधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

Maharashtra Politics: राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! माजी आमदाराने बांधलं शिवबंधन

औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्री येथे शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला आहे. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परिवारात स्वागत केले आहे.

विशेष म्हणजे वैजापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत ठाकरेंची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि आमदार सतीश चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षअंतगर्त वाद सुरु होता यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा: Uddhav Thackery: मोठी बातमी! मुंबई पोलिसांकडून उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत भाऊसाहेब चिकटगावकर यांनी प्रवेश केला आहे. स्वतः उद्धव ठाकरेंच्या हस्ते चिकटगावकर यांच्या हातात 'शिवबंधन' बांधून त्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पैठणचे भाजपचे नेते बद्रीनाथ भुमरे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते.

हेही वाचा: Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षावर १० जानेवारीला सुनावणी