अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरूपी रुग्णालय उभारणे गरजेचे!

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 8 July 2020

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्‍सिजन तसेच आयसीयूदेखील उभारले आहेत. ही सुविधा तात्पुरती असली, तरी आता पुढचे पाऊल म्हणून मुंबई आणि परिसरासाठी सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरूपी रुग्णालय तयार करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुंबई - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्‍सिजन तसेच आयसीयूदेखील उभारले आहेत. ही सुविधा तात्पुरती असली, तरी आता पुढचे पाऊल म्हणून मुंबई आणि परिसरासाठी सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरूपी रुग्णालय तयार करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सिडकोच्या साह्याने मुलुंड येथे १६५० खाटांचे रुग्णालय, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहिसर येथे ९५५ खाटांचे रुग्णालय; तर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स आणि बीकेसी येथे ६०० खाटांच्या कोरोना उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.

अजित पवारांनी दिली मोठी बातमी; राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानांवरील रुग्णालये ही संकल्पना आणली. त्यातही अशा मोकळ्या जागेवरील रुग्णालयांमध्ये आयसीयू सुरू करण्याची विक्रमी कामगिरी राज्याने देशासमोर ठेवली आहे. या सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा तात्पुरत्या असल्या, तरी त्यांचा दर्जा राखला गेला आहे. त्याची उभारणीही एखाद्या कायमस्वरूपी रुग्णालयाइतकीच भक्कमपणे झाली आहे. यासर्व सोयी अवाक्‌ करणाऱ्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाबरोबरचे युद्ध आपण नक्कीच जिंकू; मात्र कायमस्वरूपी सोय होण्यासाठी रुग्ग्णालयाचे काम हाती घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: need to set up a permanent hospital with Sophisticated treatment facilities