परीक्षार्थींसमोर नवा पेच! 'नीट', 'एमपीएससी' अन्‌ 'आयबीपीएस'ची परीक्षा एकाच दिवशी

2018_10image_10_39_525361840jee_exam.jpg
2018_10image_10_39_525361840jee_exam.jpg

सोलापूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच पावसाळ्याचे दिवस असतानाही 13 सप्टेंबरला राज्यभरात तीन मोठ्या परीक्षा होणार आहेत. नीट, एमपीएससी आणि आयबीपीएसची परीक्षा लाखो विद्यार्थी एकाच दिवशी देणे शक्‍य आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी 'आयबीपीएस' परीक्षेसाठीही अर्ज भरल्याने त्यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. 

देशभरातील परीक्षा केंद्रांवर 13 सप्टेंबरला इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्‍शन (आयबीपीएस) ची परीक्षा होणार आहे. तर त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी 'आयबीपीएस'ची परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची एक संधी हुकणार हे निश्‍चित झाले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पुढे ढकलण्यास तथा परीक्षा केंद्रे बदलास तयार नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील का असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. बहुतांश परीक्षा केंद्रे प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने त्याठिकाणी विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात का, असाही प्रश्‍न आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने विद्यार्थी हिताचा तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींकडे ठाण मांडल्याचेही चित्र असून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, आयोगाने त्यावर काहीच उत्तर दिले नसून कोरोनाच्या वाढत्या काळात आता परीक्षार्थींसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • 13 सप्टेंबर हा परीक्षेचा वार; नीट, एमपीएससी अन्‌ 'आयबीपीएस'ची परीक्षा 
  • हजारो विद्यार्थ्यांनी एमपीएससी आणि 'आयबीपीएस'साठी केले आहेत अर्ज 
  • परीक्षा केंद्रे अपुरी पडण्याची शक्‍यता; कोविड केअर सेंटरमध्ये गुंतल्या इमारती 
  • महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रे 'नीट'साठी काढले स्वतंत्र परिपत्रक 
  • स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसमोर पेच; परीक्षा पुढे ढकलावी तथा केंद्र बदलाची मागणी 
  •  

तंत्र शिक्षण मंडळाचे पत्र 
देशभरातील केंद्रांवर 13 सप्टेंबरला नीट परीक्षा होणार आहे. त्यामुळे या परीक्षेच्या केंद्रांवर 12 आणि 13 सप्टेंबरला अन्य कोणत्याही परीक्षेचे आयोजन करु नये, त्या केंद्रांवरील शिक्षकांना दुसरे कोणतेही काम देऊ नये असे पत्र महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने काढले आहे. त्यानुसार उपसचिवांनी संबंधितांना तसे निर्देश दिले आहेत. तंत्र शिक्षण मंडळाचे औरंगाबाद विभागाचे उपसचिव डॉ. आनंद पवार यांनी त्याबाबत पत्र स्वतंत्र काढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com