

तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत जलदगतीने काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तरीपण, विडी घरकूलमधील राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेतील शिक्षक अनंत अरुणराव पाटील यांना कामाबाबत सतत फोन लावले, पण त्यांचा फोन बंद, पर्यवेक्षकांनी शाळेत मुख्याध्यापकास विचारणा केली, घरी भेट दिली. तरीपण, ते भेटले नाहीत. त्यांनी या कामात अत्यंत गंभीर व बेजबाबादारपणा दाखविला आहे. त्याबाबत महापालिकेचे आरोग्य निरीक्षक मुकेश पांडुरंग बद्दुरकर (वय ३३) यांनी फिर्याद दिली. त्यावरून अनंत पाटील यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
‘एसआयआर’ हा निवडणूक आयोगाचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. त्यामुळे अनंत पाटील यांना नेमून दिलेले काम मुदतीत करणे आवश्यक असताना देखील त्यांनी कामात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा केला. त्याबाबत त्यांच्याकडे खुलासा मागविण्यात आला, पण त्यांनी तोही दिला नाही. त्यांना सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, निरोप दिले पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी निवडणुकीच्या राष्ट्रीय कामात अडथळा आणला. २७ एप्रिल २०२६ रोजी मंजूर टिपणीस अनुसरून मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून निवडणूक कामकाजात दिरंगाई, कुचराई, हलगर्जीपणा, टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधीत्त्व अधिनियम १९५१ मधील कलम १३४ नुसार अनंत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकांना ३१ जुलैपर्यंत ‘एसआयआर’चे काम
शिक्षकांना दैनंदिन शालेय कामकाज पाहून ‘एसआयआर’चे काम ३१ जुलैपर्यंत करावे लागणार आहे. दरम्यान, बीएलओ आणि पर्यवेक्षकांना ‘ईएफ’ अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (ता. १३) सर्वांचे प्रशिक्षण पार पडले. ‘एसआयआर’च्या कामामुळे इयत्ता दुसरी, चौथी व सहावीच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलाचे प्रशिक्षण लांबणीवर पडले आहे. निवडणूक आयोगाचे काम संपल्यावर शिक्षकांना अभ्यासक्रम बदलाचे प्रशिक्षण दिले जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.