'मी सर्व काही गमावलंय'; त्रिपाठी कुटुंबाला दोनच दिवसांपूर्वी मी मुंबई विमानतळावर सोडलं; ड्रायव्हरनं सांगितली हकीकत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nepal Plane Crash

नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या विमानाचा अपघात झाल्याचं स्पष्ट झालंय.

'मी सर्व काही गमावलंय; त्रिपाठी कुटुंबाला दोनच दिवसांपूर्वी मी मुंबई विमानतळावर सोडलं'

ठाणे : नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या विमानाचा अपघात (Nepal Plane Crash) झाल्याचं स्पष्ट झालं असून त्यामध्ये ठाण्यातील त्रिपाठी कुटुंबीय (Tripathi Family) प्रवास करत असल्याची माहिती समोर आलीय. त्रिपाठी कुटुंबीय 10 दिवसाची सुट्टी काढून फिरण्यासाठी नेपाळ इथं गेले होते. तिथंच झालेल्या विमान अपघातात त्रिपाठी कुटुंब बेपत्ता झालं.

अशोक त्रिपाठी Ashok Kumar Tripathi (54), वैभवी बांधिवडेकर (51), मुलगा धनुष त्रिपाठी (22) आणि मुलगी ऋतिका त्रिपाठी (18) हे अजूनही विमानसह बेपत्ता आहेत. नेपाळच्या पोखरा येथून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्यासाठी विमान पकडलं. मात्र, खराब हवामानामुळं विमानाचा अपघात झाल्याची माहिती नेपाळच्या प्रशासनानं दिलीय. दरम्यान, नेपाळमध्ये रविवारी बेपत्ता झालेल्या विमानात त्रिपाठी कुटुंबीयांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानं आशिष सावंत (Ashish Sawant) यांना धक्का बसलाय. सावंत (वय 29) हा येथील त्रिपाठी कुटुंबाचा ड्रायव्हर असून त्यानं दोन दिवसांपूर्वीच कुटुंबातील चार सदस्यांना मुंबई विमानतळावर सोडल्याचं सांगितलं.

हेही वाचा: पंजाबी गायकाची दिवसाढवळ्या हत्या; कॅनडास्थित गँगस्टरनं स्वीकारली हत्येची जबाबदारी

'मी सर्व काही गमावलंय' असं सांगून तो रडू लागला. ठाण्यातील दिवा इथं (Diva in Thane) राहणारे सावंत पुढं म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून त्रिपाठी कुटुंबाचा ड्रायव्हर म्हणून मी काम करतोय. वैभवी त्रिपाठीला मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (Bandra-Kurla Complex BKC in Mumbai) येथील त्यांच्या कार्यालयात मी सोडत असतो. दोन दिवसांपूर्वीच मी या कुटुंबाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोडलं आणि आज मला ही धक्कादायक बातमी मिळालीय, असं त्यानं दु:ख व्यक्त करुन सांगितलं. अपघाताची माहिती मिळताच, सावंत यांनी बाळकुम परिसरातील रुस्तमजी अथेना अपार्टमेंट येथील त्यांचं घर गाठलं. इमारतीचे चौकीदार सुनील चाळके (Sunil Chalke) यांनी त्रिपाठी कुटुंबातील सदस्य खूप चांगले असल्याचं सांगितलं.

Web Title: Nepal Plane Crash Driver Of Thane Tripathi Family Dropped Them At Mumbai Airport Two Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top