शिक्षक पद मंजुरीचे 'असे' ठरले नवे निकष! शालेय शिक्षण विभागाचा सचिवांना प्रस्ताव

3School_20fb - Copy.jpg
3School_20fb - Copy.jpg

सोलापूर : खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील पटसंख्या 15, खासगी अनुदानित प्राथमिकसह उच्च प्राथमिक वर्ग असणाऱ्या शाळेत 20, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील पटसंख्या 25 पेक्षाही कमी असलेल्या शाळा तेथील स्थायी शिक्षकांसह एक ते पाच किलोमीटर परिसरातील दुसऱ्या शाळेत समायोजित केल्या जाणार आहेत. व्यवस्थापनास या शाळा पुढे चालवायची असल्यास स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली जाईल, असा प्रस्ताव शालेय शिक्षण व क्रिडा शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठविला आहे. आता मंत्रिमंडळात त्यावर चर्चा होऊन निर्णय होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिली.


राज्यातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक संवर्गातील पदे निश्‍चितीसाठी 2015-16 मधील निर्णयानुसार पदे मंजूर केली जात आहेत. मात्र, आता बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार माध्यमिक शाळांमधील पाचवीचे वर्ग एक किलोमीटर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था तथा खासगी संस्थेच्या प्राथमिक शाळांना जोडले जातील. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांसाठीचे निकष जैसे थेच राहणार आहेत. दरम्यान, या नव्या निकषांची अंमलबजावणी 2021-22 पासून होईल, असेही प्रस्तावात नमूद आहे. या प्रस्तावासोबत लोकप्रतिनिधी, विधीमंडळाच्या सदस्यांनी लक्षेवधी सूचना, प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली होती, असा संदर्भ जोडण्यात आला आहे. राज्यातील शाळांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यावर पुढील महिन्यात निर्णय अपेक्षित आहे. मात्र, संस्थाचालक व शिक्षक संघटनांनी या बदलास विरोध केल्याने सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रस्तावानुसार होणारे बदल

  • 2020-21 च्या संच मान्येतनुसार अतिरिक्‍त शिक्षकांना विद्यार्थी वाढीसाठी एक शैक्षणिक वर्षाचा दिली जाणार मुदतवाढ
  • एक वर्षाची मुदतवाढ देऊनही विद्यार्थी पटसंख्या न वाढल्यास 2021-22 च्या संच मान्यतेनुसार त्यांचे अन्य शाळांमध्ये होईल समायोजन
  • कमी पटसंख्येच्या शाळांना पटसंख्या वाढविण्यासाठी 2022-23 पर्यंत मुदतवाढ देता येईल; समायोजित शाळांना शासनाचे अनुदान मिळणार नाही
  • मागील वर्षी संच मान्यता झाली नसल्याने 2018-19 मधील संच मान्यतेनुसार मंजूर असलेली पदे विचारात घेऊन सुधारित निकष ठरतील
  • 105 विद्यार्थ्यांनंतर प्रती 35 विद्यार्थ्यांमागे एक या प्रमाणात शाळेतील सहावी ते आठवीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांना मंजुरी
  •  

'माध्यमिक' शिक्षक पदनिश्‍चितीचे निकष

  • (पाचवी ते दहावी) : 1 ते 175 विद्यार्थ्यांसाठी पाच शिक्षक आणि त्यानंतर प्रती 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक
  • (आठवी ते दहावी) : 105 विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक आणि त्यानंतर प्रती 40 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक
  • (क्रीडा शिक्षक) : शाळेतील मंजूर शिक्षक आठ ते 15 असल्यास एक, 32 ते 39 शिक्षकांमागे दोन पदे
  • (कला शिक्षक) : शाळांमधील मंजूर शिक्षक 16 ते 23 असतील तर एक, शिक्षक 32 ते 39 असल्यास दोन पदे
  • (कार्यानुभव शिक्षक) : शाळेतील मंजू शिक्षक 24 ते 31 असल्यास एक पद, शिक्षक 48 ते 55 असल्यास दोन पदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com