Lokpal to Acquire BMW Luxury Vehicles
Sakal
महाराष्ट्र बातम्या
Lokpal BMW Cars : ‘लोकपाल’ फिरणार आलिशान मोटारीतून; अध्यक्षांसह सदस्यांसाठी सात वाहने खरेदी करणार
Lokpal to Acquire BMW Luxury Vehicles : देशातील सरकारी अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या 'लोकपाल'चे अध्यक्ष आणि सहा सदस्यांसाठी प्रत्येकी ₹७० लाख किमतीच्या बीएमडब्ल्यू '३३० एलआय' श्रेणीतील सात आलिशान गाड्या खरेदी करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : देशातील सरकारी अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ‘लोकपाल’चे अध्यक्ष आणि सदस्य आता आलिशान गाड्यांमधून फिरणार आहेत. यासाठी ‘लोकपाल’ने महागड्या व अत्याधुनिक सुविधा असलेल्या बीएमडब्ल्यू मोटारी विकत घेण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. अध्यक्ष आणि सहा सदस्यांसाठी बीएमडब्लू तीन मालिकेतील ‘३३० एलआय’ या श्रेणीतील सात गाड्या खरेदी करण्यात येणार आहे. या प्रत्येक मोटारीची किंमत ७० लाख रुपये आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर हे लोकपालचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

