
A Respite for Flood Victims: Amit Shah Approves ₹1950 Crore Aid.
Sakal
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा १९५० कोटी ८० लाख रुपयांचा दुसरा हप्ता जारी करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंजुरी दिली आहे. वरील निधीपैकी ३८३ कोटी ४० लाख रुपये कर्नाटकला तर १५६६ कोटी ४० लाख रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत. राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मधील केंद्राचा वाटा म्हणून हा निधी दिला जाणार आहे.