
मुंबई : राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) धर्तीवर कृषी समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. मात्र या योजनेची संभाव्य फलनिष्पत्ती आणि योजनेचे वितरण, होणारे सकारात्मक परिणाम याबाबतचा अभ्यास करण्यासाठी ‘पोकरा’च्या प्रकल्प संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल १५ दिवसांत कृषी विभागास सादर करणार आहे.