मालवणच्या खोल समुद्रात नवीन तेलसाठे सापडले असल्याची माहिती मिळाली आहे; मात्र, संबंधित विभागाकडून आपल्याकडे याबाबत कोणताही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
मालवण : येथील खोल समुद्रात सुमारे १९ हजार १३१.७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर नवीन खनिज तेलसाठे (Mineral Oil Reserves) सापडले आहेत. नव्याने झालेल्या संशोधनात मालवणबरोबरच पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेतही तेलसाठे सापडल्याने तेल उत्पादन क्षेत्रात सक्षम होण्यासाठी नवीन पर्याय मिळाला आहे. संबंधित क्षेत्रात केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या (Central Oil Production Companies) लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांकडून सांगण्यात आले.