esakal | गोव्यात राजकीय भूकंपाचे संजय राऊत यांचे संकेत
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-2.jpg

गोव्याचे माजी मुख्यमंत्री विजई सरदेसाई 3 आमदार समर्थकांना घेऊन शिवसेनेसोबत आघाडी करणार असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात जसा चमत्कार घडला आहे, तसाच चमत्कार घडण्याचे संकेत राऊत यांनी गोव्याबाबत दिले आहे.

गोव्यात राजकीय भूकंपाचे संजय राऊत यांचे संकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार प्रस्थापित झाल्यानंतरही भाजपला निशाणा केले आहे. त्य़ांनी मिडीयाशी बोलताना लवकरच गोव्यात चमत्कार होणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत एएनआयने दुजोरा दिला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात आता ठाकरे सरकारचे राज्य सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज ते कार्यभार स्वीकारणार आहेत. त्याचीच तयारी सध्या सचिवालयात सुरु आहे. तसेच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच वर्षा निवास्थान सोडावे लाणार आहे. त्यांची आवराआवर सुरु आहे.
सध्या फडणवीस यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यांना नागपूरच्या स्थानिक कोर्टाने समन्स काढले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोट्या गोष्टींची माहिती व काही माहिती लपवल्याचा ठपका कोर्टाने त्यांच्यावर ठेवला आहे.

महाराष्ट्रात सरकार बनविल्यानंतर गोव्यात देखील लवकरच चमत्कार होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री विजई सरदेसाई 3 आमदार समर्थकांना घेऊन शिवसेनेसोबत आघाडी करणार असल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात जसा चमत्कार घडला आहे, तसाच चमत्कार घडण्याचे संकेत राऊत यांनी गोव्याबाबत दिले आहे.