Yogesh Kadam Accident: आमदार योगेश कदम यांचा अपघात की घातपात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogesh Kadam Accident

Yogesh Kadam Accident: आमदार योगेश कदम यांचा अपघात की घातपात?

शिंदे गटाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला काल रात्री 11 च्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे हद्दीत अपघात झाला आहे.

हेही वाचा: Yogesh Kadam: शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात

सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. आमदार योगेश कदम हे खेड कडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने गाडीचे नुकसान झाले आहे आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आता कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: Bacchu Kadu: बच्चू कडू नाराज! थोपटले शिंदे-फडणवीसांविरोधात दंड; आता लढणार...

आमदार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. या अपघातानंतर धडक देणारा ट्रकर पलटी झाला. त्यानंतर ट्रकरचालक फरार झाला आहे. त्यामुळे हा घातपात असल्याचे बोलले जाते.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांबाबत अपघाताचे सत्र सुरु आहे. राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळीत येथे अपघात झाला होता. या अपघातामध्ये मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत.

परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली होती. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला होता. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते.

टॅग्स :accident