New Year Resolution : संकल्पाच्या नावाखाली ही 3 आश्वासने देऊ नका, तज्ज्ञांनी सांगितले तोटे

दर नवीन वर्षी संकल्प घेणे ही एक सवयीचा भाग
New Year Resolution
New Year Resolution esakal

New Year Resolution : दर नवीन वर्षी संकल्प घेणे ही एक सवयीचा भाग झाले आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती त्याच्या गरजेनुसार संकल्प ठरवतो . वजन कमी करणे, उंची वाढणे आणि इतर यासारख्या आरोग्याशी संबंधित संकल्प ठरवणे ही कॉमन गोष्ट आहे.परंतु तुम्हाला माहित आहे की रिझोल्यूशनशी संबंधित काही पद्धती फायद्याऐवजी नुकसान करू शकतात. फिटनेस एक्स्पर्ट रुजुता दिवेकर यांनी असे 3 संकल्प दिले आहेत, ज्यामुळे नुकसानही होऊ शकते. त्यांच्याबद्दल जाणून घ्या…

New Year Resolution
Kamshet Trip : आपल्या पार्टनर सोबत पॅराग्लायडिंगची मजा घ्या तीही पुण्यापासून अगदीच जवळ

१. कार्ब किंवा साखर टाळायचा संकल्प

काही आरोग्याविषयी जागरूक लोक आपल्या संकल्पात साखर, कर्बोदके आणि तांदूळ पूर्णपणे सोडून देण्याचा निर्णय घेतात. एक्सपर्ट रुजुता म्हणते की हे चुकीचे असल्याचे सिद्ध होऊ शकते, कारण असे केल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. आहारातून कोणतीही गोष्ट काढून टाकण्याऐवजी त्याचे सेवन कमी करणे चांगले.

New Year Resolution
Travel In Pune : पुण्यातल्या पुण्यातच विकेंड प्लॅन करायचा आहे? मग पू.ल देशपांडे उद्यान आहे बेस्ट

२. दररोज हेवी वर्कआऊट करायचा संकल्प

व्यायाम किंवा शारीरिक हालचालींद्वारे तंदुरुस्त राहणे चांगले आहे, परंतु जर तुम्ही डेली वर्कआऊटचं रिझोल्यूशन बनवत असाल तर ते शरीरासाठी चांगले नाही. सुरुवातीला हलका व्यायाम करा आणि त्यात थोडे अंतर ठेवा. यामुळे आपल्या शरीराला वर्कआऊटची सवय होऊ शकेल.

New Year Resolution
Travel Tips : बॅक टू बॅक ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त पैसे खर्च होत आहेत? उपयोगी पडतील या टिप्स

3 .वजन कमी करण्यासाठी चुकीचा संकल्प

वजन कमी करण्यासाठी अनेक लोक असे संकल्प घेतात, मग ते चुकीचे किंवा अनेक प्रकारे वाईट असतात. एक्स्पर्ट रुजुता सुद्धा सांगतात की रात्रभर वजन कमी करण्याची किंवा पटकन फरक दिसण्याची कोणतीही झटपट युक्ती नाही. जलद वजन कमी करणे धोकादायक ठरू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com