नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्राला निधी हवा!

नक्षलवादाला नियंत्रणात ठेवण्यात महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षांत निर्णायक यश मिळाले आहे.
नक्षलवाद
नक्षलवादsakal

मुंबई : नक्षलवादाला नियंत्रणात ठेवण्यात महाराष्ट्राला गेल्या दोन वर्षांत निर्णायक यश मिळाले आहे. राज्यातील ही परिस्थिती कायम राहण्यासाठी गोंदिया आणि गडचिरोलीत नवी ठाणी उघडण्याचा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (ता.२६) आयोजित केलेल्या मुख्यमंत्री परिषदेला ठाकरे हजर राहणार आहेत.

शहरी भागात समर्थकांचे जाळे उभारण्याच्या नक्षली मोहिमेचा राज्याच्या गृहखात्याने अदमास घेतला असून हा विषय चिंताजनक मानला जातो आहे. दिल्ली आणि कोलकता परिसरातील विद्यापीठात यशस्वी प्रवेश केल्यानंतर आता मुंबई आणि पुणे येथे कारवाया वाढवण्याचा नक्षल केंद्रीय समितीचा मनसुबा आहे. राज्यातील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माहिती दिली आहे. छत्तीसगडमध्‍ये नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी नेमलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरु आहेत. शेजारच्या राज्यातील हे नक्षलवादी महाराष्ट्रात शिरू नयेत, यासाठी अती जागरूकता पाळण्याचा महाराष्ट्राचा प्रयत्न आहे.

नक्षलवाद
आटपाडी : शुध्द पाणी विट्याला लागते; आटपाडीला का नको?

दक्षता बाळगणे आवश्‍यक

‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांनी यासंबंधीची वस्तुस्थिती कथन केली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनीही सूरजागडसारखे प्रकल्प आता महत्त्वाचे ठरवले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत नक्षलींच्या प्रमुख नेत्यांचा खातमा करण्यात आला. या स्थितीमुळे येथे नक्षलवादी उत्तर देण्याच्या प्रयत्नात असतील अशी शक्यता आहे. त्यामुळे अधिक दक्ष राहण्यासाठी बळ वाढविण्यावर भर द्यायला हवा, असे उच्चपदस्थांचे मत आहे.

महाराष्ट्राची भरीव कामगिरी

ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील भाग आता सर्वाधिक संवेदनशील आहे. नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी २००५ मध्ये केंद्र आणि राज्याने एकत्रित काम करणे सुरु केले. त्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. नक्षलवादाला रोखण्यासाठी यशस्वी कामगिरी केल्याने महाराष्ट्र तेथे महत्त्वाचा मानकरी ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com