मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (ता.05) मुख्यमंत्रीपदाबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन आणि विद्युत बसच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (ता.05) मुख्यमंत्रीपदाबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन आणि विद्युत बसच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती.

त्यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या कामाची स्तुती करताना उद्धव ठाकरेंनी पुढचं सरकार आपलं असणार असं वक्तव्य केलं. त्यानंतर थोडं थांबून पुढचा.... आणि पुन्हा थोडं थांबून थेट उपस्थितांनाचा प्रश्न विचारला. पुढचं तुम्हाला काय ते कळलं असेल? असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे भाजपनंतर शिवसेनेनंही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी सुरु केली.

दरम्यान, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार, असा निर्धार देवेंद्र फडणवीस वारंवार व्यक्त करत असतात, त्यातच उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या दावा केल्याने राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: next cm is ours uddhav thackrey says on bus inauguration function