ठरलं ! भाजपची पुढील मेगाभरती होणार 'या' तारखेला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. पुढील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम 22 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. पुढील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम 22 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतल्या महिला आर्थिक विकास मंडळातल्या सभागृहात हा पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले असून या तारखेला कोणाकोणाचा प्रवेश होणार आहे हे सांगितले नसले तरी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सोलापूरमध्ये झालेल्या मेगाभरतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तीन दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यात कोल्हापूरचे धनंजय महाडिक, उस्मानाबादचे राणा जगजितसिंह आणि साताऱ्यातील जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: next mega bharati of BJP may 22 September