Night Curfew in Maharashtra | ओमिक्रॉनमुळे राज्यात जमावबंदी लागू, वाचा नवी नियमावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray

ओमिक्रॉनमुळे राज्यात जमावबंदी लागू; वाचा नवी नियमावली

राज्यातील कोरोना परस्थिती पुन्हा ढसळण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनची वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आलाय. (Night Curfew in Maharashtra) यासंदर्भात अनिल परब यांनी घोषणा करून रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी असल्याचं सांगितलं.

राज्यातल्या कोविड (Covid19) रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स (Covid19 Task Force) सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष (New Year) स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले.

ओमिक्रॉनची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर बैठका घेतल्या. या आढावा बैठकांमधून येणाऱ्या 15 दिवसांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मिळते. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचा पीक पिरेड असण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलण्यात येत आहेत.

नक्की काय घडलं टास्क फोर्सच्या बैठकीत?

राज्यभरात रात्रीची जमावबंदी लागू

५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत

राज्यशासनाची नवी नियमावली जाहीर

३१ जिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी

फटाके फोडता येणार नाहीत, आतषबाजी नाही

लग्नसमारंभ, कार्यक्रम यांवरही निर्बंध

बंद हॉलमध्ये १०० जणांनाच परवानगी, ओपन लॉन्स असल्यास ही संख्या कमाल २५० पर्यंत

बंदिस्त जागेतील कार्यक्रम

समारंभ , लग्न, इतर कार्यक्रम यांसाठी 100 लोकांनाच परवानगी

२५% किंवा १०० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू

ओपन २५ टक्के किंवा २५० यामध्ये जी कमी ती मर्यादा लागू

उपहारगृह, नाट्यगृह, थिएटर्स 50% क्षमतेने सुरू राहणार

प्रशासनाचं आता हॉटेल ,रेस्टॉरंटकडे बारकाईनं लक्ष असेल

रुग्णसंख्या वाढल्यास स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे अधिकार अबाधित

मुंबईची स्थिती काय?

३ महिन्यांनंतर मुंबईत अचानक स्पाईक

ऑक्टोबरमध्ये मुंबईतील दरदिवशी वाढणारी रुग्णसंख्या ५५० -६०० होती

३ महिन्यांनंतर रुग्णसंख्यावाढ बघायला मिळतेय

मुंबईत दरदिवसाला 45 हजार टेस्टींग होत आहेत

टास्क फोर्सच्या बैठकीत टास्क फोर्सचा भर कशावर होता?

जलद लसीकरण मोहीम

बुस्टर डोस बाबत केंद्राकजे पाठपुरावा करणे, किमान हेल्थ/फ्रंटलाईन वर्कर्सला बुस्टर डोस मिळावा

केंद्राकडे लहानमुलांच्या लसीकरणासाठी पाठपुरावा करावा

Web Title: Night Curfew Likely To Impose In Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :night curfew
go to top