Milind Narvekar: ‘लाथ मारलेलं कुत्र्याचं पिलूही घुटमळतं…नार्वेकरांच्या चर्चेवर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nilam Gorhe reaction on news about Milind narvelar in Eknath Shinde Group

Milind Narvekar: ‘लाथ मारलेलं कुत्र्याचं पिलूही घुटमळतं…नार्वेकरांच्या चर्चेवर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एका सार्वजनिक कार्यक्रमात केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. (Nilam Gorhe reaction on news about Milind narvelar in Eknath Shinde Group )

मिलिंद नार्वेकर लवकरच शिंदे गटात येतील, ही चर्चा सध्या जोरात सुरु आहे. मात्र या सगळ्या अफवा आहेत. त्या कोण पसरवतं माहिती नाही, अशी प्रतिक्रिया गोऱ्हे यांनी दिली आहे.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मिलिंद नार्वेकर असं काही करतील, असं मला वाटत नाही. माझं हे मत आहे. दुसरं म्हणजे ज्यांना वाटतंय, ते जातील तर त्याचे पुरावे द्यावेत. काही वेळा एखादं छोटंसं कुत्र्याचं पिल्लूही असतं. त्याला लाथ मारल्यानंतरही ते इथे – तिथे फिरून लोकांना डिस्टर्ब करत असत. अशा शब्दात गोऱ्हे यांनी नार्वेकरांच्या शिंदे गटातील चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, अशा काही गोष्टी सोडल्यावर… एक महिन्यात काही झालं नाही.. ते सांगतात होणारे.. तर कधी होणार हे सांगावं त्यांनी.. उगाचच अशा प्रकारच्या अफवा पसरवणं काही योग्य नसल्याचे गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार शिंदे गटात येतील आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे सूतोवाच काही आमदार आणि शिंदे गटातील आमदारांनी केले होते. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

मागील 15 दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन दोनदा भेट घेतली होती. याचवेळी नार्वेकर हे शिवसेनेमधून फुटणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.