'100 कोटीची आॅफर नाकारली पण, पक्ष सोडला नाही म्हणणारे दगडफेक करतायेतं'...राणेंचा टोला ; Nilesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nilesh Rane, Shashikant Shinde

100 कोटीची आॅफर नाकारली पण, पक्ष सोडला नाही म्हणणारे दगडफेक करतायेतं...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा सातारा (Satara Cooperative Bank Election) जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मतानं पराभव झाला. त्यांच्या या पराभवानंतर या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच काही मातब्बर नेत्यांनी शशिकांत शिंदे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवाराला ताकद दिल्याचा आरोप करत शिंदें समर्थकांनी राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. या घटनेमुळे राज्यभरातून प्रतीक्रिया येत आहेत. पक्ष सोडण्यासाठी १०० कोटी मिळणार होते पण मी पक्ष सोडला नाही म्हणणारे आज दगडफेक करत आहेत. अशी टिका भाजपाचे नेते निलेश राणे ( Nilesh Rane) यांनी ट्विट करत केली आहे.

महाबळेश्वर (Mahabaleshwar)येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार(Sharad Pawar)यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले "सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण त्यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती." .

दरम्यान निलेश राणे म्हणाले, शशिकांत शिंदे निवडणूकीत हरल्या नंतर त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावरच दगडफेक केली. १०० कोटी पक्ष सोडण्यासाठी मिळणार होते पण मी पक्ष सोडणार नाही कारण साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. असे सांगणार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी केलेली दगडफेक हेच काय साहेबांच्या कट्टर कार्यकर्त्यांच पक्ष प्रेम. असं म्हणत निशाना साधला.

एसटीचे कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही निकालात निघाला नाही. एसटीचे कर्मचारी आणि सरकार यांच्यामध्ये चर्चेनंतर परीवहन मंत्री तोडगा काढणार आहेत. या संदर्भात निलेश राणे यांनी विचारणा केली आहे. ते म्हणतात " एसटी महामंडळाची एवढी वाईट अवस्था कधीही झाली न्हवती, साहेब अशा वेळी आपले अदृश्य हात कुठे असतात?" असा सवाल राणेंनी शरद पवार यांनी विचारला आहे. ते म्हणाले, "एसटी कर्मचारी गेले कित्येक दिवस सरकारकडे न्याय मागतायत, आपण इतके वर्ष राजकारणात आहात मग ही अवस्था का? पवार साहेब म्हणतात एसटी महामंडळाची एवढी वाईट अवस्था कधीही झाली न्हवती. साहेब अशा वेळी आपले अदृश्य हात कुठे असतात? हे खाते ७ वर्ष शिवसेनेकडे आहे हे तुम्ही तपासूनच बोलला असाल. असेही ते म्हणाले.

loading image
go to top