पोलीस बळाचा वापर करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल ; निलेश राणेंचा इशारा ; Nilesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nilesh rane said to his activist in sindhudurg to explore BJP on village level

पोलीस बळाचा वापर करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल ; राणेंचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळतच चालला आहे. याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून एसटी कर्मचारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. एसटी कर्मचारी मुंबईला जाऊ नयेत यासाठी पोलिसांचा बंदोबस्त टोलनाक्यावर दिसत आहे. राज्यभरातून एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाविषयी विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)यांनी देखील याविषयी ट्विट करत आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

ट्विटमध्ये राणे म्हणाले,एसटी कर्मचाऱ्यांना किती छळणार ठाकरे सरकार, पवार साहेबांना हे सगळं दिसत नाही का? आपल्याच राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना रोखलं जातंय कारण ते त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. पोलिसांचा वापर करून आंदोलन संपेल असं त्यांना वाटतंय पण ठाकरे सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल. असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सांगितले की, समितीने जर विलीणीकरणाबाबत सकारात्मक अहवाल दिला तर प्रश्न सुटेल मात्र, जर अहवाल नकारात्मक दिला तर काय करायचं म्हणून, आता सध्या याबाबत निर्णय घेता येणार नाही. हवं तर वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करू, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार विचार करू शकतो. संप चालणं हे एसटीसाठी आणि त्यांच्यासाठीही योग्य नाहीये. माझ्या बाजूने सगळं सांगितलं आहे. एसटी कामगारांनी लवकरात लवकर संप मागे घ्यावा अशी विनंतीही परब यांनी केली.

loading image
go to top