मंत्रिमंडळात का चिकटलाय? निलेश राणेंचा वडेट्टीवार यांना सवाल

या वक्तव्यावरुन राजकीय घडामोडींमध्ये अनेक उलट सुलट चर्चांना उधाण येत आहे
मंत्रिमंडळात का चिकटलाय? निलेश राणेंचा वडेट्टीवार यांना सवाल

रत्नागिरी : मी ओबीसी असल्यामुळे महसूल खाते (revenue department) मिळाले नाही. अशी खंत मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (vijay vadettivar) यांनी बोलून दाखवली. त्यांनी पुण्यात केलेल्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय (mahavikas aaghadi sarkar) खदखदीचे चित्र दिसून येत आहे. वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी (OBC) म्हणून आपल्यावर अन्याय झाल्याची खंत अनेकांची आहे. मात्र, या अन्यायाला जाहीर वाचाही फोडता येत नाही. कारण, तसे झाल्यास ओबीसी नेत्यांचे पंख पक्षात कापले जातात, असे दुखणे आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय घडामोडींमध्ये अनेक उलट सुलट चर्चांना उधाण येत आहे. विरोधकांनीही महाविकास आघाडी सरकारवर याप्रकरणी निशाणा साधला आहे. भाजपाचे निलेश राणे (nilesh rane) यांनी राज्यसरकारवर ट्वीटद्वारे टिका केली आहे.

ते म्हणतात, महसूल खातं मिळालं नाही ही खंत असेल वडेट्टीवारांची, तर महाविकास आघाडी ओबीसी समाजाच्या विरोधात आहे असा अर्थ होतो. पण तरीसुद्धा तुम्ही मंत्री म्हणून त्या मंत्रिमंडळात का चिटकले आहात? राजीनामा देऊन तुम्ही खरचं समाजावर प्रेम करता हे दाखवून द्या. असा टोलाही त्यांनी वडेट्टीवारांना लगावला आहे. याशिवाय महाविकास आघाडी सरकारवर खोचक टिका केली आहे.

मंत्रिमंडळात का चिकटलाय? निलेश राणेंचा वडेट्टीवार यांना सवाल
वडेट्टीवार यांना बाळासाहेब थोरातांनी दिला सबुरीचा सल्ला

दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांना पुढील काळात मोठी संधी मिळेल, त्यांनी थोडी वाट पाहावी, असा सबुरीचा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. याप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची खंत तर जगजाहीर आहे. ‘ओबीसी नसतो, तर याहून अधिक तालेवार खाते मिळाले असते. कदाचीत ओबीसी असल्यामुळे मदत व पुनर्वसन खाते मिळाले, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com