उद्धव ठाकरेंसह 9 मंत्री घेणार शपथ; सोनियांसह 'हे' दिग्गज राहणार उपस्थित

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतर तिन्ही पक्षांचे तीन-तीन असे एकून 9 मंत्री शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.

मुंबई : आता सत्तास्थापनेचा तिढा सुटल्यानंतर महाआघाडीतील काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे. 
लवकरच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत इतर तिन्ही पक्षांचे तीन-तीन असे एकून 9 मंत्री शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांची आज बैठक झाल्यानंतर उद्या कोण-कोण शपथ घेणार हे कळणार आहे. मंत्री ठरविण्याबाबत आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मंत्री पदांसाठीच ज्येष्ठ नेते शऱद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान यामध्ये उद्धव ठाकरे, अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहे.
तसेच उद्या होणाऱ्या शपथविधीला काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nine minister will take oath on tomorrow