नऊ महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रात ५३ जणांनी गमावले जीव

राजेश रामपूरकर
Sunday, 27 September 2020

राज्यात वाघासह वन्यप्राण्यांची संख्या वाढू लागले आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडीत होऊ लागले आहेत. त्यामुळे वन्यजीव आणि मानव आमने सामने येऊ लागल्याने संघर्ष वाढलेला आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यामुळे मृत पावलेल्यांची संख्या अनुक्रमे ३६ आणि ३२ होती. यंदा आतपर्यंत तो आकडा ५३ वर गेला आहे. त्यात सर्वाधिक ३२ वाघांच्या तर ११ बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहेत.

नागपूर :  वन्यप्राण्यांच्या वास्तव्यक्षेत्राचा संकोच झाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. राज्यात संरक्षित क्षेत्रासोबतच प्रादेशिक क्षेत्रातही वाघांसह इतरही वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच राज्यात यावर्षी नऊ महिन्यात अर्ध्याशतकापेक्षा अधिक जणांचे बळी गेले आहेत. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी दुप्पटीने वाढली आहे. मध्य चांदामधील विरुर वन परिक्षेत्रातील नवेगाव येथे शेतकऱ्यावर आज हल्ला करून ठार केले. 

राज्यात वाघासह वन्यप्राण्यांची संख्या वाढू लागले आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडीत होऊ लागले आहेत. त्यामुळे वन्यजीव आणि मानव आमने सामने येऊ लागल्याने संघर्ष वाढलेला आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यामुळे मृत पावलेल्यांची संख्या अनुक्रमे ३६ आणि ३२ होती. यंदा आतपर्यंत तो आकडा ५३ वर गेला आहे. त्यात सर्वाधिक ३२ वाघांच्या तर ११ बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहेत.

धक्कादायक! दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन? नागपूरच्या कंपनीची  ५२ किलो स्फोटके काश्मिरात आढळली

मध्यप्रदेशात यंदा फक्त १७ जणांचे जीव वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेलेले आहेत. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सुरू झालेला हा संघर्ष आता सर्वच अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन व आजूबाजूच्या गावांमध्ये पोहोचला आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडग्यांचे अस्तित्व असलेल्या भागात हा संघर्ष वाढला आहे. यवतमाळ, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यातील गावाजवळ वाघ आल्याच्या अनेक घटना आहे. सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असताना आता वन्यप्राण्यांचीही भीती वाढू लागली आहे. 

  • वर्ष - मृत्यू 
  • २०१६ - ५३ 
  • २०१७ - ५० 
  • २०१८ - ३६ 

  • २०१९ - ३२ 
  • २०२० सप्टेंबर - ५३ 

 

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यावर भर 

वन्यप्राण्यांची संख्या वाढत असल्याने मानवावरील हल्ले वाढलेले आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना आणल्या आहेत. मनुष्याचे वनावरील अवलंबित्व कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. 
संजय राठोड, वनमंत्री 

 

उपाययोजना करणार 

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या लक्षात घेता तेथील संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यंदा वाघासह लांडगा, अस्वल, बिबट, गवा आणि रानडुक्करांच्या हल्ल्यातही ही मनुष्यहानी झालेली. 
नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nine Month 53 Killed in Man-Animal Conflict in Maharashtra