esakal | 'जनधन'मध्ये नऊ हजार कोटी ! 'या' सात जिल्ह्यांमध्येच साडेतीन हजार कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

3Jan_Dhan_Yojana.jpg
 • जनधन खात्यांचा पसारा
 • महिला खातेदार
 • 1,55,18,358
 • पुरुष खातेदार
 • 1,33,19,394
 • एकूण खातेदार
 • 2,88,37,752
 • खात्यांमधील एकूण रक्‍कम
 • 8814.44 कोटी
 • काहीच रक्‍कम नसलेले खातेदार
 • 33,22,735

'जनधन'मध्ये नऊ हजार कोटी ! 'या' सात जिल्ह्यांमध्येच साडेतीन हजार कोटी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात जनधन योजनेचे दोन कोटी 88 लाख 37 हजार 752 खातेदार आहेत. त्यापैकी 33 लाख 22 हजार 735 खातेदारांच्या खात्यात दमडाही नाही. दुसरीकडे कोरोनाच्या संकट काळातही दोन कोटी 88 लाख खात्यांमध्ये बचतीचे आठ हजार 814 कोटी रुपयांची ठेव कायम असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या माहितीवरुन समोर आले आहे. पुणे, वाशिम, ठाणे, नगर, सोलापूर, बीड, नागपूर या जिल्ह्यांचे सर्वाधिक तीन हजार 661 कोटी रुपये जनधन खात्यात जमा आहेत.

 • जनधन खात्यांचा पसारा
 • महिला खातेदार
 • 1,55,18,358
 • पुरुष खातेदार
 • 1,33,19,394
 • एकूण खातेदार
 • 2,88,37,752
 • खात्यांमधील एकूण रक्‍कम
 • 8814.44 कोटी
 • काहीच रक्‍कम नसलेले खातेदार
 • 33,22,735

राज्यच नव्हे तर देशावर कोरोनाचे संकट आले आहे. तरीही बचतीची सवय असलेल्यांनी जनधन खात्यातील रकमेला हात लावला नाही. जूनअखेर राज्यातील जनधन खात्यात आठ हजार 844 कोटी 96 लाख रुपये होते. तर ऑक्‍टोबरअखेर या खात्यात आठ हजार 814 कोटी रुपये आहेत. जनधन खातेदारांमध्ये महिलाच अव्वल असून विशेषत: ग्रामीण भाग शहरी भागाच्या तुलनेत अग्रेसर राहिला आहे. पुणे जिल्ह्यातील 15 लाख 37 हजार 984 खातेदारांची सर्वाधिक 760 कोटींची रक्‍कम जनधन खात्यात आहे. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील 688 कोटी, ठाणे जिल्ह्यातील 577 कोटी, नगर जिल्ह्यातील 428 कोटी, सोलापूर जिल्ह्यातील 416 कोटी, बीड जिल्ह्यातील 403 कोटी, तर नागपूर जिल्ह्याची 389 कोटींची रक्‍कम आहे. बहुतांश खातेदारांना 'रूपी' कार्ड दिले असून त्याचा वापर केल्यास खातेदारांना एक लाखांचे विमा कवच मिळते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले 15 लाख मिळतील, या आशेने अनेकांनी बॅंकांमध्ये खाती उघडली. तर पुन्हा नोटाबंदी होईल, या भितीने सर्वसामान्य खातेदारांनी बॅंकांमधील पैसे काढलेच नाहीत, अशी शक्‍यता बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली.


बचतीचा पैसा बॅंकांमध्ये राहिला सुरक्षित
नोटाबंदीनंतर या खात्यात रक्‍कम वाढली, घरात साठवून ठेवलेला पैसा बॅंकेत आला. खाते उघडताना खातेदारांकडून 12 रुपये घेऊन त्यांना दोन लाखांचा अपघात विमा, तर 330 रुपयांत नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाखांचे विमा कवच दिले जाते. त्यामुळे खात्यांची संख्या वाढली असून कोरोना काळातही सोलापूर जिल्ह्यातील 14 लाखांहून अधिक खातेदारांचे 416 कोटी रुपये जनधन योजनेअंतर्गत बॅंकेत जमा आहेत. 
- प्रशांत नाशिककर, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, सोलापूर