
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडे यांना संरक्षण देण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी सूचक ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.(Nitesh Rane demand to provide police protection to gauri bhide over public interest litigation in the high court)
नितेश राणे यांनी ट्विट मध्ये सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन आणि मनसुख हिरेन या तीन दिवंगत व्यक्तींच्या मृत्यूचा उल्लेखही केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बेहिशेबी मालमत्तेचा आरोप करत गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणाची बुधवारी न्यायमूर्ती एस गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी २ आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली आहे.
हाच मुद्दा हाती घेत, नितेश यांनी सूचक ट्विट केले आहे. गौरी भिडे यांच्या जीवाचे रक्षण होणे महत्त्वाचे असून त्यांना महाराष्ट्र शासनाने संरक्षण देण्याची गरज आहे. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत आणि मनसुख हिरेन यांच्याबाबत काय झाले ते आम्हाला माहिती आहे, असे सूचक ट्विट त्यांनी केले आहे. या तिन्ही मृत्यूंवरून शिवसेना व शिवसेना नेत्यांवर याआधी गंभीर आरोप झालेले आहेत. त्यामुळे गौरी भिडे यांच्या संरक्षणावरून आता नवा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न व संपत्ती बेहिशेबी आहे. यामुळे याची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात ११ जुलै २०२२ ला मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून आम्ही तक्रारही केली आहे, असेही याचिकाकर्त्यांनी म्हंटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.