
Disha Salian Death Case: टॅलेंट मॅनेजर आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याशी संबंधित असलेली दिशा सालियान प्रकरणात मृत्यूबद्दल सीबीआयकडून तपास सुरू होता. या प्रकरणी आता सीबीआयने आज आपला निष्कर्ष दिला आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिल आहे की, "दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयच्या निरीक्षणासाठी मी दोष देत नाही. कारण या घटनेनंतर 72 दिवसांनी सीबीआय दाखल झाली. 8 जूनपासून महाविकास आघाडी सरकारच्या मदतीने 'क्लीन अप' इतकं चांगलं केलं गेलंय की, सीबीआय आली तेव्हा त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही" असं नितेश राणे यांनी लिहिलं आहे.
हेही वाचा- Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?
तर दिशा सालियानचा मृत्यू हा अपघातीच होता, असा निष्कर्ष सीबीआयने काढला. या प्रकरणी सीबीआयकडून स्वतंत्र एफआयआर नोंदवला गेला नव्हता. या प्रकरणाचा तपास बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासासोबतच सुरू होता.
दिशा सालियान ही मुंबईतल्या मालाडमधल्या गॅलेक्सी रिजंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली पडली होती. सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरामध्ये आढळला होता. त्या दिवसाच्या बरोबर पाच दिवस आधी दिशाचाही मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.