राज्यात हिंदुंना दाबण्याचा प्रयत्न केला तर मोर्चे काढू ; नितेश राणेंचा इशारा : Nitesh Rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Nitesh Rane

मालेगावमध्ये मोर्चे निघत आहेत. दगडफेक करत आहेत. जर हे असे चालेल तर राज्यात हिंदुच्या समर्थनार्थ मोर्चे निघतील.

राज्यात हिंदुंना दाबण्याचा प्रयत्न केला तर मोर्चे काढू ; नितेश राणे

त्रिपुरामध्ये मशिदींवर हल्ला करून नुकसान केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती, नांदेड, मालेगाव, बेळगावसह विविध शहरामध्ये निषेध नोंदवण्यात आला. अनेक शहरात मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान याबाबत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करीत हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही देखील मोर्चे काढू असा इशारा दिला आहे.

राणे म्हणाले, मालेगावमध्ये मोर्चे निघत आहेत. दगडफेक करत आहेत. जर हे असे चालेल तर राज्यात हिंदुच्या समर्थनार्थ मोर्चे निघतील. जर हे मोर्चे थांबवले नाहीत तर तसे मोर्चे निघतील. हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही देखील मोर्चे काढू असा इशारा राणेंनी दिला आहे.

राज्यात अशी हिंसा होणे योग्य नाही. सरकारने त्यावर नियंत्रण आणले पाहिजे. यातून दंगलीची बीजे पेरली जाण्याची शक्यता आहे. याकडे राज्याचा गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे. असे मत भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, मुंबईत झालेल्या बैठकीत ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत मुंबईची दुरवस्था पाहू शकत नाही. भाजप पालिकेवर आपला झेंडा फडकवेल. आजही तेच तेच विषय मुंबईत आहेत. दिल्लीत केजरीवाल यांनी शाळेत बदल केला आहे. पण मुंबईला काहीच देऊ शकत नाही. पाच वर्षात जो विकास केला तो आता ठप्प झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मला वाटत सर्वसामान्यांच्या प्रश्नापेक्षा यांचा इगो महत्वाचा आहे. कर्मचारी आत्महत्या करतोय पण हे आंदोलन करणाऱ्यांना निलंबित करत आहेत. हे आंदोलन जनतेचे झालेले आहे. आणि चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टिका केली आहे.

loading image
go to top