नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट, आणखी एक शिवसेना मंत्री रडारवर

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे.
Nitesh Rane,Uddhav Thackeray
Nitesh Rane,Uddhav ThackerayEsakal
Summary

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे.

सध्या अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठणाच्या विषयावरून वातावरण आणखी चिघळलं आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. यात त्यांनी एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रभु हनुमानाबद्दल आक्षेपार्ह केला असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या जुन्या व्हिडिओमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. (nitesh rane tweet controversy statement of abdul sattar)

Nitesh Rane,Uddhav Thackeray
राज्यात सत्ता यांची अन् घाबरतात आम्हाला, मनसेचा ठाकरे सरकारला टोला

राणेंनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओतून २०१७ मध्ये शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रभु हनुमानाबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केल्याचं ऐकू येत आहे. यावरून भाजपा आमदार राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान केलं आहे. स्वत:ला मर्द म्हणणारे उद्धव ठाकरेजी तुमच्या हिंमत्त असेल तर मंत्री अब्दुल सत्तारला तुरुंगात डांबून दाखवा, असं ओपन चॅलेंज आमदार राणेंनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलं आहे.

Nitesh Rane,Uddhav Thackeray
मनेसकडून जय्यत तयारी, सभेपूर्वीच पुण्याहून मागवले 50 भोंगे

दरम्यान, हनुमान चालीसा पठणाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून भाजपाने आता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा भाजपा शिवसेनेतील वाद वाढण्याची शक्यता आहे. यामुळे आता शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री सत्तार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच राजकीय वातावरणात तापलं असताना आता या व्हिडिओची भर पडल्याने आणखी कोणता नवा वाद निर्माण होणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com