Nitesh Rane |नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामिनाची प्रक्रिया सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitesh Rane case

नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी; जामिनाची प्रक्रिया सुरु

नितेश राणे यांच्यासंदर्भात मोठा निर्णय समोर आला आहे. राणेंना सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ दिलासा दिला होता. मात्र पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. यानंतर राणेंना दहा दिवसांच्या आत शरण येण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर राणेंनी शरणागती पत्कारल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा जामीनाचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारी पक्षाने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी लावून धरली आहे. (Nitesh Rane in Court custody)

दिवसभरात कोर्टात उहापोह झाल्यानंतर नितेश राणेंनी शरणागती पत्कारणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेऊन मी कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात दाखल होत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यसरकाने बेकायदेशीरपणे मला अटक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध करत असल्याचं राणेंनी म्हटलंय. (Nitesh rane will surrender in session court)

शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सध्या भाजपाचे आमदार नितेश राणे न्यायलयाच्या फेऱ्या मारत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांना शरण येण्याचा एकमेव मार्ग उरला होता. अखेर त्यांनी तो पत्कारल्याचं दिसतंय. (Nitesh Rane news)

याआधील जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याने ते जामीनसाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होते. मात्र उच्च न्यायालयासमोरील अर्जही निवेदनासह मागे घेण्यात आला असल्याची माहिती त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाकडून अजून 5 दिवसांचे संरक्षण शिल्लक असतानाही अर्जदाराच्या चौकशीला सामोरे जायचे असल्याने तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ते आता अधिकाऱ्यांना शरण जाणार असल्याचं स्पष्ट झालंय.

काय आहे नेमंक प्रकरण

कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आ राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च (Mumbai High court) न्यायालयात अपील करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा अर्ज फेटाळताच सर्वोच्य न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. गुरुवारी याच्यावर सुनावणी होत न्यायालयाने अर्ज फेटाळला. तसेच दहा दिवसांत शरणागती पत्करा व जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करा, असे आदेश दिले होते. यानुसार त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात दाखल होत शरणागती पत्करली असून जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता.

टॅग्स :nitesh rane