महाराष्ट्र बातम्या
ND Studio: नितीन देसाईंचा एनडी स्टुडिओ सरकारच्या ताब्यात; कर्जबाजारीपणामुळे दिला होता जीव
Nitin Desai: वयाच्या ५७ व्या वर्षी देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये जीव दिला होता. केली होती. या घटनेनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. स्टुडिओवर असलेले कर्ज म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले होते. बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक म्हणून जागतिक पातळीवर देसाई यांनी त्यांच्या नावाची वेगळी ओळख चाहत्यांच्या मनात तयार केली होती.
Mumbai News: ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा एनडी स्टुडिओ सरकारच्या ताब्यात गेला आहे. सांस्कृतिक विभागाच्या सचिवांनी स्टुडिओची पाहाणी केली आहे. कर्जबाजारी झालेल्या देसाई यांच्या स्टुडिओवर अनेक कंपन्यांचं कर्ज होतं.