esakal | ...अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती, गडकरींचे अधिकाऱ्यांना खडेबोल
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

...अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती, गडकरींचे अधिकाऱ्यांना खडेबोल

sakal_logo
By
नामदेव कुंभार

केंद्रीय रस्ते, वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी ओळखले जातात. शनिवारी नागपूरमध्ये गडकरी यांच्या याच स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती पाहायला मिळाली आहे. नितीन गडकरी यांनी भर कार्यक्रमात पशू-मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना वॉर्निंग दिली आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) नागपूरमार्फत शनिवारी पशुवैद्यकीय चिकित्सा संकुल इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी गडकरींनी विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, अशी तंबी प्राध्यपक आणि शास्त्रज्ञांनी दिली आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दुधाचे उत्पादन वाढविण्यात पशुवैद्यकीय विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे. पुढील तीन वर्षांमध्ये विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करुन दाखवा. टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, अशी वॉर्निंग नितीन गडकरी यांनी भर कार्यक्रमात पशू-मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना दिली. नागपूरमधील या कार्यक्रमाला राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदारही उपस्थित होते.

हेही वाचा: गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी का दिला राजीनामा? ही असू शकतात कारणं

पशुवैद्यकीय विद्यापीठात विविध प्रकारचे संशोधनाचे कार्य चालते. संशोधनाचे हे कार्य विद्यापीठापर्यंतच सीमित न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे. त्याशिवाय ग्रामीण भाग समृध्द आणि संपन्न होणार नाही. तसेच नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर करून रोजगार निर्मितीसाठी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असे मत केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. दरम्यान, पशुवैद्यकीय चिकित्सा संकुल इमारत उद्घाटन सोहळ्यातून लकमंत्री नितीन राऊत यांना हेतुपुरस्सर डावलण्यात आले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

loading image
go to top