Nagpur New 5 Flyover: शहरात आणखी पाच नव्या उड्डाणपूलांची भर पडणार आहे. या उड्डाणपूलांमुळे पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरची वाहतूक कोंडी फूटणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने ७९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
शहरात गेल्या काही वर्षांत अनेक उड्डाणपूल तयार झाले आहेत. इंदोरा ते थेट सक्करदरा उड्डाणपूलांचे काम सुरू आहेत. आता आणखी पाच नवे उड्डाणपूल तयार होणार आहे. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दक्षिण, पूर्व व मध्य नागपुरातील रस्त्यांवर उड्डाणपूलाची गरज व्यक्त करीत केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महारेलने पाच उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार केला होता. केंद्रीयमंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी या उड्डाणपूलांचे सादरीकरण केले होते. सादरीकरणानंतर दोन्ही नेत्यांसह राज्य सरकारने या उड्डाणपूलास मंजुरी दिली असून, महारेल कंपनी बांधकाम करणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच बांधकामाला सुरवात होणार आहे.
याबद्दल आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की, " पूर्व, मध्य व दक्षिण नागपुरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी बघता या उड्डाणपूलाच्या आवश्यकतेकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. या उड्डाणपूलाच्या सादरीकरणानंतर दोन्ही नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उड्डाणपूलांना मान्यता दिली असून, नगरविकास विभागाने ७९२ कोटी रुपये मंजूर केले."
रस्त्यांवर उड्डाणपूलाची गरज व्यक्त करीत केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महारेलने पाच उड्डाणपूलांचा प्रस्ताव तयार केला होता. केंद्रीयमंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल यांनी या उड्डाणपूलांचे सादरीकरण केले होते. सादरीकरणानंतर दोन्ही नेत्यांसह राज्य सरकारने या उड्डाणपूलास मंजुरी दिली असून, महारेल कंपनी बांधकाम करणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच बांधकामाला सुरवात होणार आहे.(Latest Marathi News)
या मार्गावर होणार नवे उड्डाणपूल प्रकल्पाची किंमत (रुपयांत)
रेशीमबाग ते केडीके कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडे प्लॉट- २५१ कोटी
चंद्रशेखर आझाद चौक-गंगाजमुना ते मारवाडी चौक- ६६ कोटी
लकडगंज पोलिस स्टेशन ते वर्धमाननगर- १३५ कोटी
नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक- ६६ कोटी
वर्धमाननगर ते निर्मलनगरी, उमरेड रोड- २७४ कोटी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.