'कामात अडथळा', नितीन गडकरींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

nitin gadkari
nitin gadkarie sakal

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (union minister nitin gadkari) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. तसेच काही ठिकाणचे सेनेचे स्थानिक नेते या कामात अडथळा आणत आहेत. तसेच सेनेचे कार्यकर्ते कंत्राटदारांचे अधिकारी आणि कामगारांना धमक्या देत असल्याचे गडकरींनी नमुद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

nitin gadkari
गोरेवाड्याची बनावट वेबसाइट; जाणून घ्या अधिकृत साइट व पूर्ण माहिती

अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या महामार्गाच्या चौपदीकरणाबद्दल लिहिले आहे. त्याबरोबर मालेगाव, मेहकर, सिंदखेड राजा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासोबतच इतरही काही रस्ते त्यांनी नमुद केले आहे. तिकडचे स्थानिक नेते मंडळी या कामामध्ये अडथळा आणत असून स्थानिक पातळीचे राजकारण आडवे येत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातील सेनेचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने महामार्गाच्या कामामध्ये अडथळे आणत असल्याचे गडकरींनी यामध्ये म्हटले आहे. त्यामुळेच गडकरींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्याचे बोलले जाते.

पत्रात नेमकं काय म्हटलंय? -

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र समोर आले असून यामध्ये ते म्हणतात, ''पूलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम आमचे मंत्रालय करत आहे. मात्र, वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहेत. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार रस्ता धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले. मात्र, शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रांची जाळपोळ करुन कंत्राटदाराच्या कामगारांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद पडले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्रe sakal
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्रe sakal

मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे लवकरच पूर्ण होईल. या रस्त्याच्या लांबीमध्ये पैनगंगा नदीवरील एका पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात.

अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाची कामं सुरू आहेत. वाशिम शहरासाठी बायपास निर्माण करण्याच्या कामाचा देखील समावेश आहे. परंतु, वरील सदर बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील सेनेच्या लोकप्रतिनिधींनी थांबविल्यांचे मला सांगण्यात आले आहे.

वरील सर्व बाब लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही कसे सुरू ठेवायचे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे असेल त्या स्थितीत ठेवल्यास वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण देखील वाढेल. परिणामी जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागेल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com