आमदारांच्या बैठकीआधीच नितीन नांदगावकरांवर मोठी जबाबदारी; शिवसेनेची खेळी

२०१९ मध्ये नितीन नांदगावकर यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश घेतला होता.
Nitin Nandgaonkar
Nitin NandgaonkarSakal

मुंबई : राज्यसभा निवडणुका चार दिवसांवर आल्या असताना शिवसनेने मोठी खेळी खेळली आहे. आमदारांच्या बैठकीअगोदर शिवसेनेने मनसेतून शिवसेनेत आलेल्या नितीन नांदगावकरांना मोठी जबाबदारी दिली आहे. अंतर्गत गटबाजी आणि पक्षाकडून तिकीट न दिल्याने नाराज असलेल्या नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता शिवसेनेने त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे.

(Nitin Nandgaonkar Promotion In Shivsena)

नितीन नांदगावकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर त्यांच्याकडे हे पद सोपवण्यात आलं आहे. दरम्यान राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेऊन शिवसेनेने मोठी खेळी खेळली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्याही निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यादृष्टीने शिवसेनेने नांदगावकर यांना बढती देऊन याचा किती फायदा शिवसेनेला होणार हे पहावं लागणार आहे.

दरम्यान त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. परप्रांतियांच्या विरोधातील आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्या अनेकवेळा चर्चा होत असतात. त्यांच्या या स्वभावाचा आणि योग्य उत्तर देण्याचा शिवसेनेला फायदा होणार आहे. यामुळेच शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिले आहे.

नितीन नांदगावकर यांनी २०१९ मध्ये मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेवर नाराजी व्यक्त करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत राहून आपलं काम सुरू ठेवलं होतं. त्यांचं काम पाहून आणि आगामी महापालिका निवडणुकांचे औचित्य साधून शिवसेनेने त्यांच्या हाती उपनेतेपदाची सूत्रे सोपवली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com