esakal | "जे ममता बॅनर्जी-मायावतींनी करुन दाखवलं ते पवारांना जमलं नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

"जे ममता बॅनर्जी-मायावतींनी करुन दाखवलं ते पवारांना जमलं नाही"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : शरद पवारांनी (sharad pawar) काँग्रेसची‌ (congress) काळजी करू नये. त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असला, तरी ते आतापर्यंत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसवू शकले नाहीत, अशी जोरदार टीका महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी केली.

राऊत हे एका बैठकीसाठी दिल्लीत आले आहेत. त्यांनी आज ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साकीनाका बलात्कार प्रकरणीही त्यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, "कुणावर बलात्कार होतो, हा काही राजकारणाचा विषय नाही. ही एक विकृती आहे, त्याचा‌ बंदोबस्त झालाच पाहिजे. दोषींना लवकरात लवकर कठोर शासन झालेच पाहिजे. पण या विषयाचे राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये."

हेही वाचा: OBC आरक्षणाशिवायच होणार ZP निवडणुका, तारीख जाहीर

माजी केंद्रीयमंत्री आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी काँग्रेसची अवस्था नादुरुस्त हवेलीसारखी झाल्याची टीका केली आहे. त्यावर राऊत म्हणाले, "काँग्रेस पक्षावर अनेकवेळा अशी स्थिती आली. त्यातून हा पक्ष बाहेर पडला आणि पुन्हा उभा राहिला. आताही पक्ष प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे पवारांनी काँग्रेसची चिंता करू नये. दुसऱ्यांकडे बोट दाखविताना स्वत:च्या पक्षाचा विचार करावा, असा पलटवार नितीन राऊत यांनी केला.

हेही वाचा: ठाकरे सरकार देणार चंद्रकांत पाटलांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे

पवार हे आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत. ते महाराष्ट्रात सत्तेत आमचे सहकारी आहेत. मात्र एका मित्र पक्षाबद्दल, ते अशी टीका करणार असतील, तर त्याचा आम्ही निषेध करतो. अशी टीका सहन केली जाणार नाही. पवार यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला असला, तरी त्यांना राज्यात‌ त्यांच्या‌ पक्षाचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. ममता बॅनर्जी, मायावती यांनी त्यांच्या राज्यात त्यांच्या पक्षाची स्वबळावर सत्ता आणली. त्या मुख्यमंत्री बनल्या. पण पवार तसे करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर टीका करू नये, असे नितीन राऊत म्हणाले.

loading image
go to top