Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

Nivrutti Maharaj Deshmukh challenges critics during kirtan : ''मला माहीत होतं या औलादी माझ्या मूळावर उठणार आहेत.'' असंही यावेळी बोलून दाखवलं.
Indurikar Maharaj addressing devotees during a kirtan, responding strongly to critics while discussing traditional wedding customs.

Indurikar Maharaj addressing devotees during a kirtan, responding strongly to critics while discussing traditional wedding customs.

esakal

Updated on

Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar Latest News : महाराष्ट्रातील प्रसिद्ध अन् लोकप्रिय किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर हे सध्या त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावरून चांगलेच ट्रोल होत आहे. किर्तनात साधेपणाने लग्न,समारंभ करण्याचे आवाहन करणाऱ्या निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी प्रत्यक्षात मात्र स्वत: लेकीचा साखरपुडा अगदी थाटामाटात केल्याचे समोर आले.

यावरून त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू झाली. मुंबई डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी या मुद्द्यावरून इंदुरीकर महाराजांवर जोरदार निशाणा साधला. शिवाय, सोशल मीडियावरही इंदुरकरांना जोरदार ट्रोल केलं जाऊ लागलं. यामुळे भडकलेल्या इंदुरीकर महाराजांनी एका भर किर्तनातच आपण मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षाही टोलेजंग करणार टीकाकारांना ठासून सांगितल्याचं समोर आलंय.

नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज? -

लोक बोंबलतील म्हणून कमी वयात मुलीचं लग्न केलं, मला माहीत होतं या औलादी माझ्या मूळावर उठणार आहेत. त्यालाही चॅलेंजने मी सांगून देतो, लग्न मी याच्याही पेक्षा टोलेजंग करणार आहे. बघू तुला काय करता येतं?

Indurikar Maharaj addressing devotees during a kirtan, responding strongly to critics while discussing traditional wedding customs.
Indurikar Maharaj daughter engagement : निवृत्ती महाराज इंदुरीकरांकडून लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च? ; डबेवाला संघटना अध्यक्षांची जोरदार टीका, म्हणाले...

अहो इकडे दुनिया खाल्ली लोकांनी यांची काय टाप आहे? ३० मिनिटाच्या सभेला तीन कोटी खर्च आहे, कोणत्याही चॅनलवाल्याने विचारून दाखवावं पैसे कुठून आणले? ही विकली गेलेली लोक आहेत. किती दुसऱ्याला त्रास द्यावा यालाही मर्यादा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com