मुंबई - नगरपालिका व महापालिका निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी केली, त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आघाडी केली जाईल. जेथे आघाडी करणे शक्य आहे तेथे आघाडी केली जाईल; पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी म्हणजेच ‘घड्याळा’शी आघाडी केली जाणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.