मुंबई - मंत्रालयात यापुढे स्मार्टफोन असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. गर्दी रोखण्यासाठी करण्यात आलेले विविध प्रयोग अपयशी ठरत असल्याने आता केवळ डीजी ॲपद्वारे नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयातील प्रवेश दुरापास्त होण्याची शक्यता आहे.