Education Commissioner Sachindra Pratap Singh
sakal
पुणे - राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनांच्या सर्व शाळांना प्रजासत्ताकदिनी (ता. २६) देशभक्तिपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य आहे. यात विद्यार्थ्यांच्या १०० टक्के उपस्थितीचे उद्दिष्ट आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येऊ नये, असा आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे.