esakal | यापुढे शिवसेनेशी  युती नाही - चंद्रकांत पाटील

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

‘‘महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकेल. मात्र, ते पाडण्यात आम्हाला रस नाही. यापुढे भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी कधीही युती करणार नाही,’’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते आज पत्रपरिषदेत बोलत होते.

यापुढे शिवसेनेशी  युती नाही - चंद्रकांत पाटील
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - ‘‘महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकेल. मात्र, ते पाडण्यात आम्हाला रस नाही. यापुढे भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी कधीही युती करणार नाही,’’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते आज पत्रपरिषदेत बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘महाराष्ट्रातील सरकारमधील तीन पक्ष दररोज वेगवेगळी वक्‍तव्ये करत असतात. त्यातील प्रत्येकाची दररोज वेगवेगळी भूमिका असते. पण, आम्ही त्या कोणत्याही वादात न पडता जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडणार आहोत,’’ असे ते म्हणाले. नवी मुंबई येथे झालेल्या अधिवेशनात महत्त्वाची मंडळी हजर होती. मुदतपूर्व निवडणुकीची वेळ महाराष्ट्रावर आली, तर आम्ही केव्हाही त्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२५ रोजी राज्यभर आंदोलन 
तीन पक्षांच्या कारभारात कायदा व सुव्यवस्थेकडे प्रचंड दुर्लक्ष होते आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी २५ रोजी राज्यातील तब्बल ४०० महत्त्वाच्या ठिकाणी धरणे आंदोलन केले जाणार आहे. या प्रत्येक ठिकाणी किमान एक हजार कार्यकर्ते सहभागी होतील. सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरोधात हे आंदोलन असल्याचेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.