मुंबई - ‘पेरण्याच झाल्या नाहीत तर तुमचा विमा कसा मिळणार? उंबरठ्याचे उत्पन्न मोजणार का? उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये पण जे वृद्ध आईबापाला भेटायला गावाकडे जात नाहीत, त्या सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांकडून योजना कसल्या तयार करून घेता?’ असा घरचा आहेर विधानपरिषदेतील भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी विभागाला दिला.